बुधवार दि 12 ते मंगळ दि 18 ऑगस्ट 2020
मंगळ व रवी चे भ्रमण दीड महिन्यापर्यंत सर्व जगाला प्रेरणादायक
गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कालसर्प योगाचा प्रभाव तसेच कोरोनाच्या जागतिक संसर्गामुळे जगातील अनेक व्यवहार ठप्प झालेले आहेत.
नोकरी-व्यवसायांवर गदा आलेली आहे. हाती घेतलेले कोणतेही काम होत नाही, पैसा टिकत नाही, कामधंदे मिळत नाहीत, आर्थिक अडचणींमुळे घरात वाद, आरोग्याच्या तक्रारी आहेत यासह अनेक निराशजनक उद्गार सतत ऐकू येत आहेत. पण या महिन्यात ग्रहमालेतील अत्यंत बलवान असे दोन ग्रह रवी आणि मंगळ येत्या सोळा तारखेपासून स्वराशीत येत असून ते आगामी दीड महिन्यापर्यंत सर्व जगाला प्रेरणादायक ठरणार आहेत. आत्तापर्यंत न झालेली कामे यापुढे होऊ लागतील. आर्थिक अडचणींवर मात करू शकाल. तुमची रास कोणतीही असो सर्व राशींना या दोन ग्रहांचे फायदेशीर फळ मिळणार आहे. प्रामाणिक कष्ट असतील तसेच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द व महत्त्वाकांक्षा असेल तर हे दोन ग्रह तुम्हाला निश्चितच प्रोत्साहन देतील व हाती घेतलेल्या कोणत्याही कामात यश मिळवून देतील. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही म्हण व्यवहारात लागू पडत नाही. कष्टाला पर्याय नाही, त्यामुळे कोरोनामुळे जो काही त्रास झाला असेल तो यापुढे हळूहळू कमी होऊ लागेल. लोकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू होतील. लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल मध्यमवर्गीयांचे झालेले आहेत. श्रीमंतांचा प्रश्नच येत नाही. गरिबांना सरकारने सर्व काही फुकट दिले आहे पण, मध्यमवर्गीय मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत जगत आहेत. देशात फक्त श्रीमंत आणि गरीब कामगार मजूर राहतात, असे सत्ताधाऱयांना वाटते. मध्यमवर्गीय समाजाला कुणीच वाली नसल्याचे दिसत आहे. हा समाज अत्यंत दु:खात आहे. आपल्यासाठी कुणीही काही प्रयत्न करत नाहीत, अशी भावना बळावत चालली आहे. वास्तविक सरकारने जात-पात-धर्म गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी सर्वसमावेशक धोरण आखून ती धोरणे योग्य रीतीने राबविल्यास सर्वांचे कल्याण होईल पण, असे झाले नाही. पण निसर्ग कुणावरही अन्याय करीत नाही, तसेच गुन्हेगारांनाही सोडत नाही, या म्हणीनुसार रवी आणि मंगळ हे दोन ग्रह सर्वांनाच जीवनावश्यक काहीतरी मार्ग निश्चितच दाखवतील असे दिसते पण, ग्रहमान उत्तम असले तरी आराम बसून कुणी काही देणार नाही. आपले प्रयत्नही हवेतच हे विसरू नये.
मेष –
या आठवडय़ातील रवि-मंगळाचे भ्रमण तुम्हाला सर्वदृष्टीने लाभदायक ठरणार आहे. स्वराशीशी झालेल्या मंगळ तुमचा उत्साह वाढविल. आतापर्यंत असलेली मानसिक मरगळ दूर होईल व हाती घेतलेले कोणतेही काम धाडसाने पूर्ण कराल. पंचमात आलेला रवि अनेक महत्त्वाची रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेईल. मुलाबाळांच्या बाबतीत शुभ घटना घडतील.
वृषभ –
बाराव्या मंगळामुळे कामाचा व्याप वाढेल. जन्मस्थान सोडून दूर गेल्यास नोकरी-व्यवसाय मिळू शकेल. शारीरिक आरोग्य उत्तम राहील. मतभेद वगैरे काही न होता भावंडांचे सौख्य चांगले राहील. व्यवसायिक दृष्टीने घाई गडबड होण्याची शक्मयता आहे. चतुर्थातील रविमुळे घरदार आणि मालमत्ता यांचे व्यवहार यशस्वी होतील. जमीन खरेदी-विक्रीत मोठा फायदा होईल. सरकारी कामे अडली असतील तर ती करून घ्या.
मिथुन –
लाभातील मंगळ आणि पराक्रमातील रवि या दोन जमेच्या बाजू असल्याने आतापर्यंत झालेले सर्व त्रास यापुढे कमी होऊ लागतील. अपेक्षेपेक्षा अधिक पैसा मिळू शकेल. सर्व व्यवहारात फायदा होईल. शत्रू थंड पडतील. कोणताही उद्योग किंवा नोकरी असेल, त्यात नक्कीच यश मिळेल. अडचणी आपोआप दूर होतील. शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्याकडून ऐनवेळी मदत होण्याची शक्मयता आहे पण, चंचलपणा आणि धरसोड वृत्तीमुळे काही कामे हातातून जाण्याची दाट शक्मयता आहे. त्यासाठी सावध राहावे.
कर्क –
दशमातील बलवान मंगळामुळे व्यवस्थापकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल, किंवा नोकरी विषयात एखादे उच्चपद मिळू शकेल. सरकारी कामकाजात मनाजोगते यश. कोर्टप्रकरण असतील तर त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. नवे काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल. जो व्यवसाय हाती घ्याल तो यशस्वी होईल. पण राग तसेच अतिमानसिक, भोळेपणा या गोष्टीपासून दूर राहावे लागेल. अन्यथा कुणीतरी त्याचा गैरवापर करू शकतील.
सिंह –
भाग्यातील मंगळामुळे सर्व कामात दैवी मदत मिळेल. इतरांपेक्षा काहीतरी चांगले करून दाखवल्यामुळे लोक तुम्हाला भाग्यवान समजतील. जमीन आणि घराचे व्यवहार यशस्वी होतील. धार्मिक आचरण ठेवल्यास नावलौकिक मिळेल. सर्व कामात नशिबाची साथ राहील. राशीस्वामी रवि अत्यंत बलवान असल्याने जे काही कराल ते चांगलेच असेल, आणि त्याचा आर्थिक परिस्थितीवर चांगला परिणाम झालेला दिसून येईल. पण रवि-मंगळाच्या या कालखंडात काळे कपडे चुकूनही वापरू नका, अन्यथा अडचणी येऊ शकतील.
कन्या –
बारावा रवि व आठवा मंगळ अत्यंत विचित्र आहे. बलवान ग्रह असूनही नको त्या ठिकाणी असल्याने त्यांचे म्हणावे तसे चांगले फळ मिळणे कठीण आहे. पण इच्छा कराल ते सर्व काही मिळेल. प्रति÷ा वाढेल. अत्यंत अवघड गोष्टीत अनेकांचे सहकार्य मिळेल, पण भावंडांच्याकडून काही बाबतीत नुकसान होण्याची शक्मयता. पैसा खूप खर्च होईल. खर्चावर नियंत्रण राहणार नाही. त्यासाठी आगामी दीड महिना जरा काळजीपूर्वक वागा.
तूळ –
लाभातील रवि आर्थिक बाबतीत मोठे यश देण्याची शक्मयता आहे. खानदानी व श्रीमंत मित्रमंडळी भेटतील. त्यांच्याकडून अनेक महत्त्वाची कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात पैसा मिळेल. अनेक प्रकारे बहुमोल फायदे होतील. स्पर्धा परीक्षा तसेच मुलांच्या बाबतीत काही अडचणी येण्याची शक्मयता आहे. सप्तमातील मंगळामुळे वैवाहिक जीवनातील किरकोळ वादावादी उग्र स्वरूप धारण करू शकतील. मन शांत ठेवून वागणे हितावह ठरेल. पश्चिमेकडील प्रवास लाभदायक ठरू शकतात.
वृश्चिक –
दशमातील रविमुळे नोकरीत उच्चपद मिळण्याचे योग. सरकारी नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. मनातील अनेक गोष्टींना मूर्त स्वरूप मिळेल. राशीस्वामी मंगळ बलवान आहे. त्यामुळे शत्रुंचे काही चालणार नाही. अनपेक्षितरित्या नविन जबाबदाऱया पडतील व त्यांचा आर्थिक मोबदलाही मोठय़ा प्रमाणात मिळेल. आळस व चंचलता मात्र सोडावी लागेल. तसेच इतरांकडे लक्ष न देता हाती घेतलेल्या कामाकडे लक्ष केंद्रित करा, नक्की यश मिळेल.
धनु –
या महिन्यातील सर्वात भाग्यवान रास म्हणता येईल. बलवान रवि-मंगळाचा तुमच्या राशीशी होणारा उपयोग शुभयोग, राजयोग सारखे चांगले फळ देईल. साडेसातीच्या प्रभावामुळे अडलेली अनेक कामे यापुढे होऊ लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. हाताखालची माणसे आपोआप चांगले वागू लागतील. विवाह, संतती, प्रवास व नोकरी बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. अतिउष्णता व पित्त तसेच अतिक्रोध यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर –
अष्टमातील बलवान रविमुळे काही संकटातून सुटका होईल. तुमच्यामुळे अनेकांचे जीवन सुधारण्यास मदत होईल. चतुर्थातील मंगळ घरदार वाहन जमीन खरेदी तसेच इस्टेटव्यवहारात फायदेशीर आहे. पण गुरु-केतु योगामुळे महत्त्वाची कामे सोडून इतरत्र मन वळण्याची शक्मयता दिसते. त्यामुळे व्यावहारिक बाबांकडे विशेष लक्ष द्यावे. किरकोळ मतभेद असेल तर ते त्वरित मिटवा.
कुंभ –
सप्तमातील रविमुळे चारचौघात तुमचे वजन वाढेल. मालमत्ता संदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्याल. कोणत्याही कामात शिस्तबद्धता दिसून येईल. सासरवाडी कडून काहीतरी मदत मिळण्याची दाट शक्मयता. सामाजिक क्षेत्रात असाल तर अनेक उपयोगी कामे करू शकाल. मंगळाचे भ्रमण कर्तबगार व्यक्ती म्हणून तुमची प्रति÷ा वाढविल. काही बाबतीत भावंडांचा हटवादीपणा नडेल.
मीन –
धनस्थानातील मंगळामुळे धाडसी कृतीतून धनलाभ होण्याची शक्मयता दिसते. मोटार रेसिंग, मेकॅनिकल लाईन, जमिनीचे व्यवहार तसेच मशीन, रेल्वे संबंधित क्षेत्रात असाल तर चांगली प्रगती होईल. रविचे भ्रमण काही बाबतीत अनुकूल आहे. घरातील काही प्रति÷ित लोकांचे विचार तुमच्या जीवनाला सोनेरी वळण देऊ शकतील. तरीही हल्लीच्या कालमानानुसार आपण कसे वागावे कसे राहावे, याचा निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यावा लागणार आहे.