एकाच रात्री पाच घरे फोडल्याने गावात भीतीचे वातावरण : शेतकरीवर्ग मळणी कामात गुंतल्याने चोरटय़ांनी साधला डाव
वार्ताहर /नंदगड
झुंजवाड (के. एन.) व बिडी गावातील पाच घरांतून अट्टल चोरटय़ांकडून चोरी करण्यात आली. शनिवारी एका रात्रीतच सदर घटना घडली. पाच घरांपैकी चार घरमालक परगावी राहत होते.
झुंजवाड (के. एन.) येथील मशीद गल्लीत तिन्ही घरे एकमेकाला लागून आहेत. तिनही घरे बऱयापैकी होती. चोरी करण्यात आलेल्या घरमालकांपैकी नबीसाब देशपाईक हे गोवा येथे विद्युत खात्यातील निवृत्त वरि÷ कार्यकारी अभियंता असल्याने ते गोवा येथेच राहतात. वर्षातून एक-दोनवेळा सणानिमित्त गावी येतात. त्यामुळे त्यांनी घरात किंमती वस्तू ठेवल्या नव्हत्या. तर त्यालाच लागून त्यांचे चुलत भाऊ अश्पाक देशपाईक यांचे घर आहे. तेही गेल्या काही दिवसापासून कामानिमित्त अळणावर येथे राहत आहेत. तर त्याला लागून असलेले घुडूचांद देशपाईक हेही आपल्या मुलांसमवेत बेळगाव येथे राहत आहेत. त्यामुळे तिन्ही घरातून किमती वस्तू ठेवण्यात आल्या नव्हत्या. घुडूचांद यांनी त्यांच्या घरातील दानपेटीत 1500 रुपये ठेवले होते. तेवढीच रक्कम चोरांच्या हाती लागली. घराचे कुलूप तोडून चोर घरात घुसले. त्यानंतर त्यांनी घरात ठेवलेल्या तिजोऱया फोडल्या आहेत. तर कपडे ठेवलेल्या ठिकाणी त्यांनी काहीतरी हाताला लागते का हे पाहण्यासाठी शोधाशोध केली.
बिडी येथे चोरी
त्याच रात्री बिडी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर घराचे मालक महाराष्ट्रमध्ये कामाला होते. तर बिडी येथील निवृत्त मुख्याध्यापक आपल्या मुलांच्याकडे काही दिवस राहण्यासाठी गोव्याला गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून दरवाज्याही फोडण्यात आला आहे. बिडी येथील चोरीत कोणता ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला याचा तपशील अद्याप उपलब्ध झाला नाही.
चोरी झालेल्या घराच्या बाजूला काही कुटुंबे राहतात. परंतु ते झोपेत असल्याने चोरीचा कोणताही थांगपत्ता लागला नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित चोरीच्या ठिकाणी नंदगड पोलिसांनी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तीन दिवसात चार ठिकाणी चोरी
गेल्या तीन दिवसात चिखले, शेडेगाळी, झुंजवाड, बिडी आदी चार ठिकाणी बंद घरातून चोरी करण्यात आली आहे. सध्या तालुक्मयातील गावोगावी भातकापणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग घराला कुलूप लावून शेतात कामाला जात आहेत. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे चोरी करत आहेत.