उत्पन्नात 72 टक्के वाढ – 2.42 अब्जचा झाला तोटा
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सीस्को
टॅक्सी सेवा क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी उबरच्या जुलै ते सप्टेंबर काळात उत्पन्नात बऱयापैकी वाढ झाली आहे. पण सदरच्या कालावधीत कंपनी मात्र तोटय़ात राहिली असल्याचे समजते.
कंपनीचे नुकसान हे वॉलस्ट्रीटच्या अंदाजापेक्षा जास्त राहिले आहे. ऍप आधारीत टॅक्सी सेवा देणाऱया उबर कंपनीला जुलöसप्टेंबरच्या तिमाहीत 2.42 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. वर्षाआधी याच कालावधीत कंपनीला 1.1 अब्ज डॉलरचा तोटा झाला होता. कोरोनासंबंधीत कडक नियमावली मागे घेण्यात आल्यानंतर उबरचा टॅक्सी सेवा व्यवसाय पुन्हा झेपावताना दिसतो आहे.
सेवा सुरूचा परिणाम
देशभरात बससेवा, रेल्वेसेवा, विमानसेवा पुन्हा कार्यरत झाल्याने उबर टॅक्सी सेवेचा लाभ घेणाऱयांची संख्या वाढली. त्यामुळे अलीकडच्या काळात उत्पन्नात चांगली वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 72 टक्के वाढत 4.85 अब्ज डॉलरवर पोहचले आहे.