प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून ड़ॉ मोहीत कुमार गर्ग यांनी मंगळवारी सकाळी कार्यभार स्विकारल़ा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देवून गर्ग यांचे स्वागत केल़े याप्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े मोहीतकुमार गर्ग हे यापूर्वी गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत हेत़े
मूळचे पंजाब येथील असेलेले ड़ॉ मोहीत कुमार हे 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत़ ते एमबीबीएस डॉक्टर आहेत़ ड़ॉ मोहीत कुमार यांची मणीपूर येथे नियुक्ती झाली होत़ी त्यावेळी निवणूक काळात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना पोलीस महासंचालक पदक बहाल करण्यात आले होत़े जून 2018 मध्ये ते महाराष्ट्र केडरला आले होत़े यानंतर त्यांची नियुक्ती गडचिरोली येथे झाली होत़ी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संकट उभे आह़े बंदोबस्तासाठी पोलिसांवरचा तणाव वाढत आहे. नवे पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहीत कुमार यांच्यासमोर देखील कारोनाच्या पार्श्वभूमिवर उद्भवलेल्या परिस्थितीशी मुकाबला करतानाच कर्मचारी व अधिकाऱयांचे आरोग्य साभाळण्याचे आव्हान असणार आह़े