गैरकृत्यांसाठी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांच्या नावांचा सर्रास वापर. संबंधित नगरपालिका अधिकाऱयांचा गैरकृत्यांकडे कानाडोळा. वेळोवेळी विपेत्यांना उठवावा लागतो आवाज. पालिकेने कडक पावले उचण्याची मागणी.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली नगरपालिका बाजारातील इमारतीत तसेच संपूर्ण बाजार परिसरात सध्या अनेक प्रकारच्या अंदाधुंद कारभारांना उत आला आहे. बाजारात गैरकृत्ये करण्यासाठी काही लोकांकडून थेट पालिका मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांच्याही नावांचा थेट वापर केला जात आहे. मजेची बाब म्हणजे त्यावर नगराध्यक्षांना विचारण्यात आल्यावर त्यांचा कोणताही सहभाग अशा प्रकारांमध्ये आढळून येत नाही. बाजारात चालणाऱया गैरकृत्यांकडे पालिकेतील संबंधित अधिकारी थेटपणे किंवा हेतुपुरस्सर कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत असून वेळोवेळी अशा गैरकृत्यांविरोधात बाजारातील विपेत्यांना आवाज उठवून पालिकेला जाग आणावी लागत आहे.
विशेष म्हणजे आज अशी गैरकृत्ये करणाऱयांकडून पालिकेला वेळोवेळी गृहीत धरून कामे केली जात आहेत. अथवा सदर कामांसाठी पालिकेतीलच काही अधिकाऱयांचे अप्रत्यक्षपणे पाठबळ अशा लोकांना मिळत असल्याची जोरदार चर्चा बाजारात सुरू आहे. पालिकेच्या अधिकाऱयांना न जुमानता तसेच पालिकेचे नियम धाब्यावर बसवून बाजारात कोणीही आपल्या मर्जीनुसार लागत आहेत. असेच दिसून येत आहे.
नगराध्यक्षांचे नाव वापरत खुल्या जागेत अतिक्रमणाचा प्रयत्न.
डिचोली बाजारातील भाजी व फळ मार्केटमध्ये असलेल्या एका खुल्या जागेचा वापर सणासुदीच्या काळात स्वयंसहाय्य महिला गटांना आपले पदार्थ किंवा उत्पादने विक्री करता यावी यासाठी करता यावा असा ठराव पालिकेने घेतला आहे. असे असतानाही या खुल्या जागेच्या शेजारील एका दुकानमालकाने कोणत्याही प्रकारचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण न करता बेकायदेशीरपणे सदर खुल्या जागेला सिलींग करून घेण्याचे काम सुरू केले. सदर खुल्या जागेत या बाजार इमारतीत भाजी फळे विक्री करणाऱया विपेत्यांनी देवी लक्ष्मीचा फोटो लावला आहे. त्यासमोर दररोज दिवावात लावली जाते. तसेच दरवषी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तेथे भव्य असे लक्ष्मीपूजनही होते.
या खुल्या जागेला सिलींग करीत असल्याचे पाहून विपेत्यांनी सदर दुकानमालकाला काम करण्यापासून अडविले. तेव्हा त्या दुकानमालकाने थेट आपल्याला नगराध्यक्षांनी सदर कामासाठी परवानगी दिल्याचे सांगितले. याची तपासणी करण्यासाठी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण याविषयी अनभिज्ञ असल्याचे सांगितले होते. आणि सदर काम बंद पाडले होते. तसेच सिलींग करण्यासाठी करण्यात आलेले पहिल्या टप्प्याचे काम हटविण्याचे आदेश दिल्यानंतर हटविण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणावर त्यावेळी पडदा पडला होता.
पुन्हा त्याच जागेचा बेकायदेशीरपणे वापर करण्याचा प्रयत्न.
खुल्या जागेत सिलींग करण्याचे प्रकरण मागे पडल्यानंतर पुन्हा सदर जागेचा विषय गेल्या दोन दिवसांमध्ये चर्चेला आला. सिलींग करण्याचा प्रयत्न केलेल्या त्याच दुकानमालकाने आपल्या दुकानात घातलेल्या एसीचा कॉम्प्रेसर सदर खुल्या जागेत लावण्यासाठी काम सुरू केले. भिंतीला भोक पाडून त्यातून केबल घालत बाहेर कॉम्प्रेसर लावण्यासाठी ब्रेकेट लावत असतानाच पुन्हा स्थानिक विपेत्यांनी सदर दुकानमालकाला रोखले. त्यावर त्याने पुन्हा आपल्याकडे या कामाची परवानगी असल्याचे दाखवत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱयांनी आपल्याला कामाची परवानगी दिल्याचे या विपेत्यांना सांगितले. तसेच या कामासाठी आपण पालिकेला केलेल्या अर्जावर मुख्याधिकाऱयांनी मारलेरा शेरा दाखवत आपल्याला या कामाचा ना हरकत मिळाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. परंतु विपेत्यांना त्याचे काहीच न ऐकता थेट नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या कानावर सदर बाब घातली.
नगराध्यक्षांची घटनास्थळी येऊन बेधडक कारवाई
आपल्या नावाचा पुन्हा गैरकृत्यांसाठी वापर होत असल्याचे ऐकताच नाराज झालेल्या नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी अवघ्याच क्षणात बाजार गाठला आणि ते सदर दुकानमालकावर जाम भडकले. गैरकृत्याविरोधात नगराध्यक्षांचे आक्रमक रूप प्रथमच बाजारातील विपेत्यांना पहायला मिळाले. सदर दुकानदाराला बरेच सुनावत काम बंद करण्याचा आदेश त्यांनी दिला. सदर जागा आपली नसून ती जागा स्वयंसहाय्य महिला गटांसाठी राखीव ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. सदर सर्व काम बंद करून ती जागा पूर्वपदावर आणण्याची सुचना नगराध्यक्षांनी यावेळी दुकानदाराला केली. आणि पुन्हा खुल्या जागेत कोणतेही बेकायदा काम हाती घेतल्यास पोलीस तक्रार नोंदविण्याचा इशारा दिला. नगराध्यक्षांच्या या भुमिकेचे बाजारातील सर्व विपेत्यांनी स्वागत करत इतरही ठिकाणी चाललेल्या मनमर्जी कारभारावर कठोरतेने लक्ष पुरविण्याची मागणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका एड. अपर्णा फोगेरी यांनीही याठिकाणी भेट दिली व अशा प्रकाराबध्दल नाराजी व्यक्त केली होती.
पालिका निरिक्षकांकडून चुकी दाखविणाऱया विपेत्यांनाच केले जाते लक्ष्य
सदर खुल्या जागेत सर्वप्रथम सिलींग करण्याचा प्रयत्न सदर दुकानमालकाने केला होता. त्यावेळी विपेत्यांनी काम अडवत नगरपालिकेला कल्पना दिली. या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या एका पालिका निरिक्षकाच्या सदर बेकायदा बाब लक्षात आणून दिली असता. सदर निरिक्षकाकडून बेकायदा कामाला लक्ष्य करण्याचे सोडून विपेत्यांना त्यांच्या चुकी दाखवून देत त्यांनाच लक्ष्य बनविण्याचा प्रकार घडला. खुल्या जागेत कोणाच्या परवानगीने देवी लक्ष्मी?चा फोटो लावल्याचा प्रश्न सदर बाजार निरिक्षकाने विपेत्यांना करीत, सदर प्रकार बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला. सदर बाजार निरिक्षकांचे वागणे हे त्या दिवशी “चोर सोडून सन्याशाला फासी” असाच प्रकार असल्याची टिका विपेत्यांनी करीत नाराजी व्यक्त केली होती. तसेच या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याची शंका व्यक्त केली होती.
चतुर्थीपूर्वी होता भाजी फळ विपेत्यांच्या स्थलांतराचा विषय.
या बाजारातील अंदाधुंद कारभाराची अनेक उदाहरणे समोर आहेत. गेल्या गणेश चतुर्थीच्या पूर्वी भाजी फळ बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून आपला माल थाटून व्यवसाय करणाऱया भाजी व फळ विपेत्यांचे स्थलांतरण करण्याचा विषय बराच चर्चेत आला होता. सध्या भाजी व फळ विपेते बसत असलेल्या ठिकाणाहून त्यांनी दुसऱया बाजूने स्थलांतर करावे आणि काही नगरसेवकांच्या मर्जीतील या व्यवसायातील विपेत्यांना तेथे जागा उपलब्ध करून द्यावी. असा प्रयत्न चालविला होता. बाजार व्यवस्थापन समिती तसेच बाजार निरिक्षकांनी या प्रकरणात बरेच लक्ष दिले होते. परंतु त्यावेळेसही जागरूक विपेत्यांनी आवाज उठवत या विषयावर बराच गोधळ माजला होता. तसेच स्थानिक नगरसेविका अपर्णा फोगेरी यांनी या विपेत्यांना पाठिंबा देत त्या त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. त्यानंतर बाजार व्यवस्थापन समितीसह बैठकीत चर्चा करून सदर स्थलांतराचा विषय मागे घातला होता. त्यामुळे त्यावेळी या विषयावर पडदा पडला होता.
स्थानिक विपेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष. कोणीही कुठेही थाटतात दुकाने.
बाजारातील भाजी व फळ विक्री मार्केट ही सदर वस्तू मिळण्याची खास जागा आहे. परंतु या बाजार इमारतीच्या बाहेर इतरत्र जागांवर राजरोसपणे भाजी फळ विपेते आपापली दुकाने थाटत असल्याने बाजारात बसणाऱया विपेत्यांना त्याचा फटका बसतो. इतरत्र विखरून बसणाऱया सर्व गावठी भाजी फळ विपेत्यांना एकाच छताखाली आणण्याची मागणी सदर स्थानिक विपेते गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. परंतु त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच दिल्या जात आहे. बाजारात विखरून बसणाऱया भाजी व फळविपेत्यांमुळे वाहतुकीचाही खोळंबा अनेकवेळा होतो. मात्र त्याकडे जबाबदारी अधिकाऱयांकडून कोणत्याही प्रकारे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, अशी खंत सदर स्थानिक भाजी विपेत्यांनी व्यक्त केली.