बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हाधिकाऱयांच्या बंगल्या बाहेर तैनात करण्यात आलेल्या एका पोलीसाने एसएलआरने स्वतःवर गोळय़ा झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. प्रकाश गुरण्णावर (वय 36) असे त्यांचे नाव आहे.
स्क्रीझोफोनिया मनोव्याधीने तो त्रस्त होता. मध्यंतरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांने औषधे घेणे बंद केले होते. अशी माहिती कुटुंबियांनी वरि÷ पोलीस अधिकाऱयांकडे दिली आहे. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्त सीमा लाटकर, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
मंगळवारी मध्यंतरी रात्री ही घटना घडली असून बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश हा गेल्या आठदिवसांपासून जिल्हाधिकारी बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होता. तो सातत्याने स्मार्ट फोनमध्ये गुंग असायचा. दोन दिवसापूर्वी त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या हातातील अंड्रॉईड मोबाईल काढून घेऊन त्याला वापरण्यासाठी बेसिक हॅंडसेट दिला होता. त्यामुळे झालेल्या मनस्तापातून
प्रकाशने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.