पणजी / प्रतिनिधी
गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्यावतीने डॉ. अनिता संतोष तिळवे यांच्या ’भावतरंग’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दि. 4 डिसेंबर 2020 रोजी सायं 4 वाजता फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिराच्या परिषद सभागृहात होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नाईक तुयेकर (पुष्पाग्रज), समारंभाध्यक्ष म्हणून डॉ. सोमनाथ कोमरपंत आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वसंकर हे उपस्थित असतील.
रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.