पुणे / वार्ताहर :
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याने केलेल्या जामीन अर्जावर 16 जानेवारीला निकाल होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू असून, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला आहे.
भावे याला बॉम्बफोटाच्या गुह्यात 10 वर्ष शिक्षा झाली असून त्यातील पाच वर्षे तो तुरुंगात होता. अपील लवकर चालणार नाही म्हणून उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. आता त्याला जामिनावर सोडल्यास तो फरार होऊ शकतो. तसेच पुराव्यांमध्येदेखील छेडछाड करू शकतो. कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक संघटनात्मक गुन्हेगारी कायद्यानुसार या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा जबाब घेतला आहे. त्यात त्याने या गुह्यात भावेची काय भूमिका आहे, हे पोलिसांना सांगितले होते.