प्रतिनिधी / पणजी
अमलीपदार्थविरोधी गोव्याच्या पोलिसांनी (एएनसी) सांतक्रूझ येथे काल केलेल्या कारवाईत 1 लाख 62 हजार 500 किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयितासाठी आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
प्रथमेश मयूर नाईक (23) व जबीन व्हेलेंटिना फर्नांडिस अशी संशयितांची नावे आहेत. एएनसी उपनिरीक्षक प्रियंका सावंत व त्यांच्या टीमने ही कारवाई केली असून उपनिरीक्षक अरुण देसाई पुढील तपास करीत आहेत.