बैठकीत जिल्हाधिकाऱयांचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
तंबाखूजन्य कोणताही पदार्थ विक्री केल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. शाळेपासून 100 मीटरपर्यंत असलेल्या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. तरीदेखील काही ठिकाणी त्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तेव्हा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी हा आदेश दिला आहे. शिक्षण व आरोग्य विभागाने कारवाईसाठी पुढे येणे गरजेचे आहे. शिक्षकांसह सर्व कर्मचाऱयांनी तंबाखू विक्री थांबविण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. विक्री करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे नोंदवावेत, असेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून धुम्रपान करणाऱयांवरही कारवाई करा, अशा वस्तुंच्या जाहिरातींवरही निर्बंध घालावेत. अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्री करण्यास तसेच खरेदी करण्यास पूर्ण बंदी आहे. अशा प्रकारे करताना कोणी सापडल्यास संबंधित पालकांना सक्त ताकीद द्यावी, असेही सांगण्यात आले.
जिह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांजवळ तंबाखूजन्य पदार्थांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शहराबरोबरच तालुक्मयात कठोर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावे, असे त्यांनी सांगितले. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून देशामध्ये दररोज 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, असे डॉ. बसवराज तुक्कार यांनी म्हटले.
या बैठकीला महापालिका आयुक्त जगदीश के. एच., गुन्हे व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी डॉ. शशिधर मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.