ऑनलाईन टीम / मुंबई :
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत गोगीची भूमिका निभावणारा अभिनेता समय शाह याला काही गुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी देखील त्याला दोन वेळा धमकी देण्यात आली आहे.
या प्रकरणी समय याने बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही गुंड सतत जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे त्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. यासोबत त्याने सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना दिले आहेत. सध्या हे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे गुंड समायच्या बिल्डिंगखाली उभे राहून त्याला शिवीगाळ करतात. शिवाय त्याला जीवे मरण्याची धमकी देखील देतात. ऐके दिवशी या गुडांनी त्याला रोखल आणि शिविगाळी करू लागले. त्यानंतर समयने फोन केल्यावर गुंडांनी तेथून पळ काढला आणि ‘तुला पाहून घेऊ’ अशी धमकी देखील दिली.
यासंबंधी खुद्द समयने देखील सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली, ‘दोन दिवसांपूर्वी देखील हा इसम माझ्या बिल्डिंगखाली आला आणि मला त्रास देवू लागला. मला काहीच माहित नाही तो असं का करत आहे. मला त्रास देण्यामागे त्याचा काय उद्देश आहे? एवढचं नाही तर त्याने मला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.’
माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यासोबत मी ही माहिती शेअर करत आहे. कारण हे माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. असं तो स्टोरीमध्ये म्हणाला आहे. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.