ऑनलाईन टीम / बँकॉक :
थायलंडच्या दौऱ्यावर आलेले हंगरीचे विदेश मंत्री पीटर सिजार्टो यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती थायलंडचे आरोग्य मंत्री अनुतीन चार्नविराकुल यांनी दिली.
ते म्हणाले, राजधानी बँकॉकमध्ये आल्यानंतर पीटर आणि प्रतिनिधीमंडळात सहभागी असलेल्या अन्य 12 सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
या चाचणीमध्ये पीटर यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. तर अन्य सदस्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, पीटर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांना विशेष विमानाने हंगरी पाठवले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.