काहीच ऑर्डर केली असताना घरासमोर 100 हून अधिक अमेझॉन पॅकेजचा ढिग लागण्याची घटना अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये घडली आहे. येथे राहणाऱया जिलियन कॅनन स्वतःच्या घराबाहेर अमेझॉनचे 150 बॉक्स पाहून चकित झाल्या. या बॉक्समध्ये मास्क हेते. जिलियन आता हे मास्क स्थानिक रुग्णालयांना दान करत आहेत.
हे पॅकेज 5 जूनपासून डिलिव्हर होणे सुरू झाले हेत. प्रारंभी स्वतःच्या व्यवसाय भागीदाराने स्टुडिओसाठी काही तरी ऑर्डर केल्याचे त्यांना वाटले. पण बॉक्स उघडल्यावर त्यात विविध प्रकारचे मास्क त्यांना आढळून आले. तर त्यांनी आणि त्यांच्या भागीदाराने कुठलीच ऑर्डर केली नव्हती. बॉक्स पुन्हा तपासून पाहिले असता त्यावर त्यांच्याच घराचा पत्ता होता, पण नावाचा उल्लेख नव्हता.
पॅकेज येण्याचे सत्र न थांबल्याने जिलियन यांनी अमेझॉनशी संपर्क साधला. अमेझॉनने ही चूक सुधारेपर्यंत जिलियन यांना 150 हून अधिक पॅकेज डिलिव्हर करण्यात आले होते आणि यात हजारो मास्क होते. हे बॉक्स ठेवू शकता असे अमेझॉनने त्यांना सांगितले होते. यामुळे जिलियन यांनी हे मास्क स्थानिक रुग्णालयांमध्ये दान केले आहेत.