दापोली/प्रतिनिधी
शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका ममता मोरे यांचे नाव अखेर नगराध्यक्षपदी नाव निश्चित झाल्याचे महाविकास शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
दापोली नगरपंचायत निवडणुकी नंतर दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यानंतर जाहीर झालेल्या आरक्षणात दापोली नगरपंचायतवर नगराध्यक्ष म्हणून महिला आरक्षण जाहीर झाले. यामुळे राष्ट्रवादीने आपला पहिला नगराध्यक्ष पदाचा दावा मागे घेत शिवसेनेला नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा करून दिला. यामुळे शिवसेनेच्या ममता मोरे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असल्याचे शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी ममता मोरे या नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.