वार्ताहर / गोकुळ शिरगाव
बुधवार दिनांक 3 जुन रोजी दिल्ली, हैदराबाद, कोल्हापूर या विमानाने हा तरुण सकाळी अकराच्या विमानाने कोल्हापूर मध्ये आल्यानंतर या प्रवाशाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या के एम टी ने डी .वाय .पाटील हॉस्पिटल मध्ये तपासणीसाठी पाठवले होते. त्यावेळी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. यानंतर हा तरुण एका खाजगी हॉटेलमध्ये राहायला गेला. गुरुवार 4 जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सगळ्यांचीच धावपळ उडाली.
याबाबत विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कुमार कटारिया यांना विचारले असता त्यांनी हा तरुण मूळचा कानपूर चा असून तो दिल्ली हैदराबाद कोल्हापूर या विमानातून उतरल्यानंतर सर्वच प्रवाशांना नेहमीप्रमाणे मेडिकल चेकअप साठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये पाठवण्यात आले. आज त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आपल्याला गुरुवारी समजले. ज्यावेळी हा तरुण ज्या विमानातून आला त्याचे आसन क्रमांक २ सी या सीटवर होता . तर त्याच्यापासून बाकीचे असणारे पॅसेंजर 3 अ सीटवर असल्यामुळे या तरुणाच्या विमानातील बाकीचे प्रवासी पूर्ण सोशल डिस्टन्स सिंग मध्येच होते, त्यामुळे या विमानात असणाऱ्या इतर प्रवाशांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आपण इथून विमान उतरल्यानंतर पूर्ण विमान सॅनीटायझर करूनच सोडतो. तर विमानतळावर स्क्रीनिंग व सोशल डिस्टन्स सर्व मेडिकल सुविधा उपलब्ध असल्याने कोणी याठिकाणी घाबरण्याचे कारण नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले,