प्रतिनिधी/ बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी चॅम्पियनशिप लीग क्रिकेट स्पर्धेला सोमवार दि. 21 डिसेंबरपासून युनियन जिमखाना मैदानावर प्रारंभ होत आहे.
या स्पर्धेत 6 क्रिकेट क्लब संघांनी भाग घेतला आहे. सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स, एसीसीईएसएस इलाईट, हुबळी टायगर्स, एमसीसीसी, सहारा स्पोर्ट्स व अलोन स्पोर्ट्स या संघांचा समावेश आहे. सोमवारी जिमखाना मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, पुरस्कर्ते दीपक नार्वेकर, सहा संघांचे मालक, बोर्ड ऑफ पेरेन्ट्स संघटनेचे विक्रम देसाई, नागेश देसाई, परशराम पाटील, नासीर सनदी, राजसिंह राजपूत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचा सामना सुपर एक्स्पेस अर्जुन स्पोर्ट्स वि. एसीसीईएसएस इलाईट यांच्यात सकाळी 8.30 वा. तर दुसरा सामना हुबळी टायगर्स वि. एमसीसीसी यांच्यात दुपारी 1.30 वा. खेळविण्यात येणार आहे.