सातारा आंदोलन- वनरक्षक वनपाल संघटनेचा इशारा
प्रतिनिधी / सातारा
मेळघाट येथे कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांचा जाचास कंटाळून आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली याला जबाबदार असणाऱ्या उप वनरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून कठोर शिक्षा देण्यात यावी आशी मागणी वनरक्षक वनपाल संघटना शाखा सातारा यांच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन मार्फत करण्यात आली.
त्याच बरोबर शिवकुमार याला पाठीशी घालणाऱ्या अप्पर मुख वन संरक्षण मेळघाट एम एस रेड्डी यांना ही सह आरोपी म्हणून घेऊन त्यांचावर ही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटने मार्फत करण्यात आली.