11 दुचाकींवर कारवाई : अडीच हजाराचा दंड
प्रतिनिधी / देवगड:
देवगड व जामसंडे शहरामध्ये गुरूवारी 11 दुचाकीस्वारांवर कारवाई करीत 2 हजार 500 रूपये दंड तर चार दुचाकी जप्त केल्याची, माहिती वाहतूक पोलीस मिलिंद परब यांनी दिली. दुचाकीस्वारांवर कारवाई होत असल्याने दुचाकी वाहने कमी झाली असली तरी चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू आहेत.
लॉकडाऊन असताना विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱयांना जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांत 32 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. तर सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. देवगड व जामसंडे शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.