वनविभाग तपासणीसाठी कोलकाताला पाठवणार
प्रतिनिधी / देवबाग
देवगड तालुक्यातील तारामुंबरी समुद्रकिनारी मच्छीमारांना स्पर्म व्हेल प्रजातीतील देवमाशाची उलटी सापडून आल्यानंतर शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता देवबाग समुद्रकिनारी फ्रान्सिस जॉन फर्नांडिस आणि किस्तु लुद्रीक या मच्छीमारांना देवमाशाच्या उलटीसारखा अत्यंत सुवासिक पदार्थ आढळून आला.
पीठासारखा चिकट असलेला हा पदार्थ सुमारे दहा किलो वजनाचा आहे. मच्छीमारांनी वनविभागाला याबाबत कल्पना दिल्यानंतर वनविभागाने सदर पदार्थ ताब्यात घेतला आहे. पुढील तपासणीसाठी कोलकताला पाठवला जाणार आहे. देवमाशाच्या उलटीला ‘अंबरग्रीस’ म्हणतात.