स्वतः शेती करून मिळवितात अन्न, मुलांनी पाहिली नाही कधीच शाळा
एखाद्या सहलीवर जर तुम्ही हिरव्यागार ठिकाणी पोहोचलात आणि कधीच तेथून परतला नाही असा कधी विचार केला आहे का? असा विचार अमलात आणणे सर्वसामान्यांसाठी अवघड आहे, पण एलेन फिशर नावाच्या महिलेने असे केले आहे. तिने स्वतःच्या कुटुंबासमवेत शहरातील धकाधकीचे जीवन सोडून एका सुंदर बेटावर राहण्याचा निर्णय घेतला. आता तिला 4 मुले असून ती पती एंड्रय़ूसोबत हवाई येथे स्थायिक झाली आहे. या अमेरिकन दांपत्याने मौइ नावाच्या छोटय़ाशा ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत केले. त्यांची चारही मुले त्यांच्यासोबत राहतात, त्यांना स्कुलिंगसाठी देखील त्यांनी कुठेच पाठविलेले नाही.
मुलांची आई असण्यासह त्यांची शिक्षिका देखील आहे. मुलांच्या देखभालीची सर्व जबाबदारी माझ्यावर असल्याचे एलेन सांगतात. एलेन स्वतःचे युटय़ूब चॅनेल चालवितात आणि इन्स्टाग्रामवर स्वतःच्या जीवनातील छायाचित्रे शेअर करतात. त्यांनी पती एंड्रय़ूसाब्sात मिळून 4 मुलांचे पालनपोषण केले असून यात 10 वर्षीय एल्विस, 6 वर्षीय सँडी, 3 वर्षीय मुलगी स्काउट आणि एका नवजाताचा समावेश आहे.
एलेनचे 725 हजार सब्सक्राइबर्स आहेत. त्या स्वतःच्या फॉलोअर्ससह स्वतःची तंदुरुस्त जीवनशैली आणि झाडांमधून मिळणाऱया अन्नाच्या पाककृती शेअर करतात. याचबरोबर बेटावरील साधारण जीवन आणि पालकत्वाच्या अनोख्या पद्धतीबद्दल सांगतात. 34 वर्षीय एलेन यांचे इन्स्टाग्रामवर देखील 522 हजार फॉलोअर्स आहेत. मुलांच्या भोजनापासून वीगन फूडच्या सर्व पाककृती लोकांसोबत शेअर करण्यासाठी त्या ओळखल्या जातात.
वीगन आहार
एलेन स्वतः 15 वर्षांपासून वीगन डायटवर आहेत. त्यांनी स्वतःच्या 4 मुलांना देखील वीगन डायटच दिला आहे. 6 लोकांच्या कुटुंबात दररोज वीगन आहारच तयार होतो. आहारात स्थानिक फळांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मुलांना शिकण्यासाठी शाळेत पाठविण्याऐवजी त्यांना घरातच शिकविले जाते. एलेन आणि त्यांचे पती बालपणीचे मित्र राहिले असून त्यांना एकत्रितपणे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळविली आहे. पण आता ते स्वतःची कमाई सोशल मीडियाच्या स्पॉन्सरशिपद्वारेच मिळवितात.
स्वतःचे पॉडकास्ट एलेन यांचे स्वतःचे पॉडकास्ट देखील आहे. तेथे त्या हवाईमधील स्थानिक जीवन आणि वीगन आहाराबद्दल लोकांना माहिती देतात. 2018 मध्ये त्यांनी मोईमध्ये स्वतःचे घर घेतले होते. बहुतांश फळे आणि भाज्यांचे पिक त्यांच्याकडूनच घेतले जाते. घरातच जॅम आणि सॉस तयार केला जातो. मफिंस, हमस आणि मुलांच्या पसंतीच्या गोष्टी मीच तयार करते. याचमुळे मला सुपरमार्केटच्या फेऱया माराव्या लागत नाहीत असे एलेन यांचे सांगणे आहे.