मालवण /प्रतिनिधी –
ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल शिवसेना नगरसेविका सेजल परब यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. तसेच ह्या योजनेच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून येथीलच ऐतिहासिक पद्मगड किल्ल्याला पाणीपुरवठा योजनेचा लाभ द्यावा. पद्मगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षात वाढलीय. तरी पद्मगड किल्ल्याला नळपाणी योजनेचा लाभ मिळावा. तसेच त्याठिकाणी सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी नगरसेविका परब यांनी आमदार नाईक यांच्याकडे केली.