बेळगाव / प्रतिनिधी
येथील के. एल. ई. एस. डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दि. 1 जानेवारी या नववर्षारंभ दिनी जन्म घेतलेल्या ‘न्यू इयर बेबीं’चे आनंदोत्सवाने स्वागत करण्यात आले. दि. 1 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर दिवसभरात या हॉस्पिटलमध्ये एकूण अकरा बालकांचा जन्म झाला. त्यांना हॉस्पिटलतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांच्यातर्फे भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.