प्रतिनिधी/ निपाणी
येथील नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, नगरसेवक संतोष सांगावकर, नगरसेविका आशा टवळे यांचा येथील वॉकर्स मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. वॉकर्स मंडळाचे अध्यक्ष अरुण चव्हाण, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सेपेटरी दिलीप आवळेकर, सदस्य डॉ. विनायक तिळवे, डॉ. सुनील ससे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
निपाणी पालिकेतर्फे राबविण्यात येणाऱया विविध योजनांची, स्वच्छता व कचरा निर्मुलनाविषयी माहिती देत निपाणी शहराचा सर्वांगिण विकास करणार असल्याचे नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी सांगितले. माजी मुख्याध्यापक प्रल्हाद नरके यांनी मंडळावतीने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी शोभा वडगावे, शालन हिरवे, शालन पावले, वैजयंती बुद्धाचार्या, दत्ता माळगे, नयना उळेगड्डी, मुमताज अरब, डॉ. निला शेट्टी, सारीका बर्डे, जैषुनिसा मुजावर, नारायण पाटील, शिवाजी घोडके, शिवाजी वडणकर, आशा पुणेकर, अरुण पराकटे, लक्ष्मण जाधव, रावसाहेब जनवाडे, सुधीर नडविनमनी, राजेंद्र पोतदार, अनिल पोतदार, सुधाकर बुडके, विजय सावंत, आदर्श सुतार, अरुण चव्हाण, हरिषचंद्र शांडगे, संजय माने, धनंजय जाधव, डॉ. मीना ससे, डॉ. शितल शेट्टी, अनिल मिरजे, अजित कुरबेट्टी, अमित रणदिवे, सिकंदर माळकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.