काणकोण तालुक्यातील तीन विद्यालयांचा शालान्त परीक्षा निकाल 100 टक्के
प्रतिनिधी / काणकोण
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत माशे येथील श्री निराकार विद्यालयाचा आर्य अजय प्रभुगावकर हा 95.16 टक्के (571) गुण घेऊन विद्यालयात व पैंगीण केंद्रात प्रथम आला असून विद्यालयाचा निकाल 97.14 टक्के इतका लागला आहे. भार्गवी उल्हास वारीकने 541 आणि रजत जयेश नाईकने 537 गुण घेऊन विद्यालयात अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. या विद्यालयातून एकूण 35 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील विशेष श्रेणीत 12, प्रथम वर्गात 13, तर दुसऱया वर्गात 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयातून परीक्षेला बसलेल्या 39 पैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 97.44 टकके लागला आहे. पार्थ अनिल कामत हा 92.33 टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम आला आहे. तर प्रचिती गुरुदास रायकर 85.33 टक्के व सिया नरेंद्र लोलयेकर 84.05 टक्के गुण घेऊन विद्यालयात अनुक्रमे दुसरी व तिसरी आली आहेत. या विद्यालयातून विशेष श्रेणीत 10, प्रथम वर्गात 13, दुसऱया वर्गात 14 आणि तृतीय वर्गात 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.
दामोदर विद्यालयाचा निकाल 96 टक्के
लोलयेच्या श्री दामोदर विद्यालयाचा निकाल 96 टक्के इतका लागला असून ईशा वैकुंठ नाईक 91.5 टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम आली आहे. या विद्यालयातून विशेष श्रेणीत 4, प्रथम वर्गात 13, दुसऱया वर्गात 5 आणि तृतीय वर्गात 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. किंदळे-पणसुले येथील श्री कात्यायणी बाणेश्वर विद्यालयाचा निकाल 97.1 टक्के इतका लागला असून विधी विश्वदीप देसाई ही विद्यार्थिनी 93.33 टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम आली आहे. तर तिशा तुळशीदास नाईक 87 टक्के गुण घेऊन विद्यालयात दुसरी व सिद्धराज संदेश गावकर 86.17 टक्के गुण घेऊन तिसरा आला आहे.
आमोणे येथील बलराम निवासी शाळेतून परीक्षेला बसलेल्या 57 पैकी 56 विद्यार्थी &उत्तीर्ण झाले असून यज्ञा रमेश तवडकर 90 टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम आली आहे. या विद्यालयातून विशेष श्रेणीत 6, प्रथम वर्गात 35, तर दुसऱया वर्गात 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय, गवळ-खोल शासकीय विद्यालय आणि खोतीगाव शासकीय विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर तुडल हायस्कूलचा निकाल 97.22 टक्के इतका लागला आहे.