वार्ताहर / सांबरा
निलजी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी मिलन मोनेश म्हातारी (शिंदोळी) यांची तर उपाध्यक्षपदी गंगव्वा लक्ष्मण पुजेरी (शिंदोळी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार अध्यक्षपदासाठी मिलन मोनेश म्हातारी व पल्लवी वसंत पाटील यांनी अर्ज दाखल केले
होते.
उपाध्यक्ष पदासाठी गंगव्वा लक्ष्मण पुजारी यांचा एकमेव अर्ज आला होता. यातील पल्लवी वसंत पाटील यांनी अर्ज माघार घेतल्याने दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निलजी ग्राम पंचायतीच्या अखत्यारित शिंदोळी गावचाही समावेश असून ग्राम पंचायतीची सदस्य संख्या 21 आहे. सदर निवडीनंतर अध्यक्षा व उपाध्यक्षा या दोघांचाही पुष्पहार घालून सत्कार केला. निवडणूक अधिकारी म्हणून शहर शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी काम पाहिले.