टोरँटो : येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील टोरँटो मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून जपानच्या निशिकोरीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने पोलंडच्या हुरकेझला दुसऱया फेरीत पुढे चाल मिळाली.
जपानच्या निशिकोरीने या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात केमेनोव्हिकचा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला होता. दरम्यान खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे निशिकोरीने दुसऱया फेरीतील सामना सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत निशिकोरीने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. 31 वर्षीय निशिकोरीने 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.