ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच दिल्लीतून एक चिंता वाढवणारी बातमी येत आहे. नीती आयोगाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही इमारत तातडीने सील करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना नीती आयोगाचे उप सचिव अजित कुमार यांनी सांगितले की, नीती आयोग भवनाच्या इमारतीतील कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आम्ही आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सगळ्या निर्देशांचे पालन करतो आहोत. ही इमारत तातडीने सील करण्यात आली आहे. तसंच या इमारतीचं सॅनिटायझेशनही करण्यात येतं आहे.
पुढे ते म्हणाले, ज्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे त्याच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
दरम्यान, सध्या दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहचली असून 54 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 877 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.