27 पासून होते बेपत्ता
सावंतवाडी:
कोलगाव-नाईकबाग काजरकोंड पुलानजीक ओहोळाजवळ नेमळे (माणिक चौक) येथील सुरेश विष्णू राऊळ (50) हे गुरुवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळले. सुरेश राऊळ हे आपल्या कोलगाव येथील बहिणीकडे राहत होते. मजुरी करून ते उदरनिर्वाह करत होते. 27 डिसेंबरला फणसाचे कुवरे काढण्यासाठी जातो, असे भावोजी सुरेश महादेव धुरी यांना सांगून ते घराबाहेर पडले. ते पुन्हा घरी आले नाहीत. त्यामुळे नातेवाई&क शोध घेत होते. गुरुवारी दुपारी तेथील एक महिला काजरकोंड पुलाजवळ गुरांना आणण्यासाठी गेली असता त्यांना सुरेश राऊळ बेशुद्धावस्थेत दिसले. तिने तिच्या बहिणीला माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने खात्री केली असता ते सुरेश राऊळ असल्याची खात्री पटली. या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, हवालदार सतीश देसाई, धनंजय नाईक यांनी पचंनामा केला. यावेळी पंचायत समिती सदस्य मेघ:श्याम काजरेकर, पोलीस पाटील उमेश सावंत उपस्थित होते. या घटनेची माहिती नेमळे येथील कुटुंबियांना देण्यात आली. राऊळ यांना मद्यप्राशन करण्याची सवय होती. त्या नशेतच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, भाऊ असा परिवार आहे.