रत्नागिरी वरवडेतील प्रभाकर डोर्लेकर यांनी जपलाय छंद : णतंही प्रशिक्षण नसताना तयार केल्यात हुबेहूब प्रतिकृती
विजय पाडावे / रत्नागिरी
तुमच्या अंगभूत असलेली कला तुमची वेगळी ओळख किंवा तुमचं वेगळेपण जगासमोर आणते…पण, त्यासाठी गरज असते ती जिद्द आणि चिकाटीची….रत्नागिरी जिह्यातील वरवडे गावच्या पेशानं खलाशी…54 वर्षीय प्रभाकर डोर्लेकर यांनी आपल्या अंगभूत कलागुणांच्या आधारे आपलं वेगळेपण जपलंय…कोणतंही प्रशिक्षण नसताना प्रभाकर यांनी लाकडापासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू पाहून कौतुकपर ’सॉलिड’ हा शब्द आल्याशिवाय राहणार नाही.
मुंबईची प्रसिद्ध बीएमसी बिल्डींग, ताज हॉटेल, लंडनमधील ब्रीज, प्रसिद्ध असं टायटॅनिक जहाज, खोल समुद्रातील ऑईल प्लॅन्ट, विविध मंदिरं, विमान आणि जहाजांच्या या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत. रत्नागिरी जिह्यातील वरवडे गावच्या प्रभाकर डोर्लेकर यांनी…महत्त्वाचं म्हणजे 54 वर्षीय प्रभाकर वयाच्या 25 व्या वर्षापासून बोटीवर खलाशी म्हणून काम करतात. त्यांचं शिक्षण देखील केवळ आठवी पर्यंत झालंय. कलाकुसरीच्या वस्तु तयार करण्याकरता त्यांनी कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. मागील 17 वर्षे बोटीवरून परतल्यानंतर मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिलेला आहे.