पंतप्रधानांची दिवाळी यंदाही जवानांसोबत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवषीप्रमाणे यावषीही लष्कराच्या जवानांसह दिवाळी साजरी करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यंदा पंतप्रधान राजस्थानच्या जैसलमेर सीमेवर दिवाळी साजरी करण्यासाठी जाण्याची शक्मयता आहे. पंतप्रधानांच्या जैसलमेर दौऱयात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे देखील सोबत असतील. लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात गेल्या 7 महिन्यांपासून संघर्षाची परिस्थिती आहे. अशा स्थितीत पंतप्रधान जैसलमेरला जात जवानांचा उत्साह वाढवणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी आपली प्रत्येक दिवाळी सीमेवर सुसज्ज असलेल्या जवानांसमवेत साजरी करत आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी ते लोंगेवाला पोस्टवर दिवाळी साजरी करतील.