परळी/प्रतिनिधी
शनिवारी रात्री उशिरा राजापूरी येथील कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला. तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कारी येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. पंधरा दिवसात दुसरा मृत्यू झाल्याने भागात कोरोनाची दहशत अजूनही कायम आहे.
परळी भाग डोंगररांगांवर वसलेले आहे. या भागात अतिपर्जन्यमान तसेच रोजगार नसल्याने आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावेच्या गावे मुंबईला रोजगारासाठी म्हणून गेलेले आहेत. कोरोनाचा फैलाव मुंबईला वाढल्यावर चौथ्या लॉकडाऊन शिथील करताच मिळेल त्या परिस्थितीत मुंबई वाल्यांना गावाकडचा रस्ता धरावा लागला. यामुळे चौथ्या लॉकडाऊन पर्यंत सर्व काही सुरळीत असताना मुंबई-पुणेकर परळी खोऱ्यात परतल्यावर राजपुरी, वावदरे, कारी, चाळकेवाडी, कूस खुर्द, कूस बुद्रुक, निगुडमाळ, रायघर, आशा गावांमधून एकूण 25 कोरोना बाधित आढळल्याने अशातच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिमनवाडी (कारी) येथील 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे परळी खोरे भयभीत झाले होते. अशातच आता राजापूर येथील 71 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. विशेष म्हणजे जवळजवळ एक महिना हा पुरुष आपल्या कुटुंबियांबरोबर होम कॉर्नटाईन होता. शेवटच्या एक-दोन दिवसातच तो कोरोना बाधित होऊन दगावल्याने राजापुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर वृद्ध हा 17 मे रोजी आपल्या सहा कुटुंबीयांसमवेत मुंबईहून स्वतःची गाडी घेऊन आपल्या गावी परतला होता. तेव्हापासून तो होम कॉर्नटाईन होता. ठोसेघरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांच्या निदर्शनाखाली आरोग्य सेवक आशा स्वयंसेवक तपासणीसाठी जात असताना स्वाइन फ्लू सदृश्य लक्षणे दिसलीच नव्हती. सदर व्यक्तीस भूक लागत नाही यामुळे खासगी डॉक्टरांकडे दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आणि त्यानंतर 11 जून रोजी त्यांना जेवण जात नाही असा त्रास होत असल्याने ते खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी गेले. तिथेही पटकन फरक न पडल्याने 12 तारखेला अन्य डॉक्टरांकडे तपासणी केली.
12 जून सायंकाळी पाच वाजता त्यांना खासगी रुग्णालयात ऍडमिट करून घेतले 13 तारखेला त्यांचे स्वाब नमुना पॉझिटिव्ह आला खाजगी बरोबरच सरकारी दवाखान्यातील ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाल्याने भागात एकच खळबळ उडाली होती.आरोग्य सेवक तसेच आशा यांच्या दैनंदिन तपासणी मध्ये कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. त्यांच्या कुटुंबातील सहा जणांना हाय रिस्क याना विलगिकरन कक्षातदाखल केले तर दोन डॉक्टर यांना लो रिस्क मध्ये आहेत.
26 दिवसांनी झाला कोरोना बाधित
सदर 71 वर्षीय वृद्ध 17 मे रोजी आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या गावी म्हणजे राजापुरी येथे आला होत्या. गेल्या सव्वीस दिवसांपासून तो होम कॉर्नटाईन होता तपासणीसाठी गेले असता कोणतीही लक्षणे जाणवली नाही. परंतु तरीही स्वब तपासणीत बाधित आढळल्याने भागात एकच थरकाप उडाला .
राजापुरी येथे आशांना दगडाने मारहाण
राजपुरी येथे मुंबई हुन आलेल्यांची तपासणी करण्यासाठी आशा स्वयंसेवक तसेच अंगणवाडी सेविका गेले असता तेथील काही महिलांनी त्याच्याबर दगडफेक करून मारहाण केली. तसेच आशांना शिविगाळ केली होती त्यामुळे तपासणीत कर्मचाऱ्यांना अडचनि येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घ्यालण्याची मागणी होत आहे.