वाळपई / प्रतिनिधी
पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणारी नागपंचमीची पूर्वतयारी सत्तरी तालुक्मयात जोरात सुरू आहे. सत्तरीच्या जवळपास सर्वच गावांमध्ये हा सण साजरा करण्यात येत असून यामुळे गेल्या काही दिवसापासून या संदर्भाची पूर्वतयारी सुरू झालेली आहे .आज नागपंचमी साजरी करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी वेगवेगळय़ा स्तरावर नागाची पूजा करण्यासंदर्भात आवश्यक स्वरूपाची तयारी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सध्यातरी तालुक्मयात वेगवेगळय़ा भागांमध्ये मूर्तिकाराकडून नागाच्या मुर्त्या तयार करण्यात आल्या असून वाळपई शहरामध्ये त्याची विक्री सुरू झालेली आहे. सत्तरी तालुक्मयात हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत असतो. अनेक गावांमध्ये हा सण वेगवेगळय़ा पद्धतीने साजरा करण्यात येत असतो. पूर्वीच्याकाळी सत्तरी तालुक्मयामध्ये जवळपास संध्याकाळच्या सत्रात साजरा करण्यात येत होता. कारण त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. गुराढोरांना चरण्यासाठी घरातील गडी रानात घेऊन गेल्यानंतर घरातील गडी जोपर्यंत माघारी पोहोचत नाही तोपर्यंत साजरा करण्यात येत नव्हता. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये हा सण संध्याकाळी उशिरा साजरा करण्यात येत होता. आताची परिस्थिती वेगळी आहे. सध्या गुराढोरे नसल्यामुळे घरातील गडी घरामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे दुपारच्या सत्रात हा सण साजरा करण्यात येत असतो. ज्यावेळी संध्याकाळच्या सण साजरा करण्यात येत होता. त्यावेळी घरातील सर्व मंडळी उपवास राखून या सणाचे पावित्र्य राखणे संदर्भात महत्त्वाचे होते. काही वर्षापासून दुपारीच हा सण साजरा करण्यात येत असल्यामुळे उपवास राखण्यावर बंधन नाही. मात्र घरातील सौभाग्यवती व महिला भगिनी हा उपवास कडकपणे पाळत असतात. नागपंचमी यादिवशी पातोळय़ा हा खास पदार्थ घरामध्ये तयार केला जातो. यासाठी सध्यातरी हळदीच्या पानांची विक्री शहरांमध्ये सुरू झाली आहे. नागपंचमी हा खऱया अर्थाने निसर्गाची पूजा करण्याची परंपरा असून शेकडो वर्षांपूर्वी ती विकसित झालेली आहे. तेव्हापासून हा सण पारंपारिक पद्धतीने व बदलत्या स्वरूपात साजरा केला जात असतो.