प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत हे शनिवारी, 29 मे रोजी जिल्हा दौऱयावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवारी, सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 37 व्या दीक्षांत समारंभास ऑनलाईन उपस्थिती, दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी अधिकाऱयांसमवेत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बैठक, दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे तौक्ते चक्रीवादळ नुकसानीबाबत तालुकानिहाय आढावा बैठक, दुपारी 2 ते 3 राखीव, दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक, दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सायंकाळी सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.