ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 23 हजार 970 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 8 हजार 535 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 990 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 496 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 19 हजार 587 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 11 हजार 375 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 7 हजार 532 आहे. कोरोनाबाधित एकूण 680 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 381 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणााऱ्या रुग्णांचे प्रमाण 58.07 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.47 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 60 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 58 हजार 785 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 932 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 34 हजार 487 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 23 हजार 970 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.