प्रतिनिधी / सातारा
जम्बो कोविड रुग्णालयात कोरोनाने मृत झालेल्या रुग्णाचा चेहरा दाखवण्यासाठी नातेवाईंकाना पैशाची मागणी होत आहे. यांची गांभीर्याने दखल घेत तत्कालीन प्रभारी रामचंद्र शिंदे यांनी संबंधित कर्मचायांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक आणि पालिका मुख्याधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात उपचारासाठी अव्वल स्थानावर असलेल्या साता-यातील जम्बो कोविड सेंटर मध्ये अनेक चुकीचे प्रकार घडत आहेत. रुग्णांच्या मृत्यूनंतर अत्यसंस्कारापर्यत अनेक टप्प्यावर नातेवाईंकाना लुबाडण्याचा प्रकार समोर येत आहे. यातील काही प्रकार उघडकीस आल्याने याला आळा बसला आहे. परंतु आता नवीन प्रकार समोर आला आहे. कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला कि नातेवाईंकाना त्यांच्या जवळ काय पण चेहरा बघण्याचीही परवानगी नाही. यामुळे शेवटचा चेहरा दाखवतो म्हणत काही कर्मचारी पैशाची मागणी करत आहेत. या अमिषाला दररोज नातेवाईंक बळी पडत आहेत. यांचा फायदा अनेक जण घेत आहेत. याला आळा बसवण्यासाठी आता जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. असे कृत्य करणाया कर्मचायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.