मुंबई
स्थानिक पोलाद उत्पादक कंपन्यांनी भारतात पोलादाच्या किंमती 4 हजार ते 4 हजार 500 रुपये प्रति टन इतक्या वाढवल्या असल्याचे समजते. पोलाद महागल्याने यावर अवलंबून असणाऱया प्रकल्पांवरचा खर्च येणाऱया काळात वाढणार आहे. हॉट रोल्ड कॉइल (एचआरसी) आणि कोल्ड रोल्ड कॉइलच्या (सीआरसी)किंमती वरीलप्रमाणे वाढल्या आहेत. त्यामुळे एक टन एचआरसीकरीता आता 67 हजार रुपये तर 1 टन सीआरसीसाठी 80 हजार रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.