प्रतिनिधी / बेळगाव
शुक्रवारी पोलीस परेड मैदानावर पोलीस ध्वज दिन कार्यक्रम साजरा झाला. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एच. जी. राघवेंद्र सुहास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आकर्षक पथसंचलनही झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधीक्षक आर. आर. कल्याणशेट्टी, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अमृत होसमनी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, एसपी लक्ष्मण निंबरगी आदी अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱयांनी पोलीस ध्वज स्टीकरचे अनावरण केले. यावेळी बोलताना राघवेंद्र सुहास म्हणाले, निवृत्त पोलीस अधिकारी जर एखाद्या पोलीस स्थानकात कामानिमित्त गेले तर त्यांचा मान राखा, त्यांचा अनादर करणे योग्य नाही. तुम्हीही एक दिवस निवृत्त होणार आहात, असे सांगत पोलीस अधिकाऱयांना निवृत्त अधिकाऱयांशी सौजन्याने वागण्याचा सल्ला दिला.