वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या वरिष्ठ पुरूष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या प्रशिक्षकपदाच्या करारात वाढ करण्याचा निर्णय अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने घेतला आहे.
फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी 2022 च्या सप्टेंबरपर्यंत राहील. 2023 साली चीनमध्ये होणाऱया एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र होण्यासाठी स्टिमॅक यांच्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय फुटबॉल फेडरेशनच्या तांत्रिक समितीने घेतला आहे. 2019 च्या मे महिन्यात स्टिमॅक यांची भारतीय पुरूष फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी दोन वर्षांच्या कालावधीकरिता नियुक्ती करण्यात आली होती.