वृत्तसंस्था/ टोकियो
23 जुलैपासून येथे टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी विविध देशांची क्रीडा पथके यापूर्वीच दाखल झाली आहेत. दरम्यान युगांडाच्या पथकातील एक वेटलिफ्टर गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाला होता. जपानच्या पोलिसांनी त्याला शोधण्यात यश मिळविले आहे.
युगांडाच्या वेटलिफ्टरचे नाव ज्युलियन सिकीटोलेको असे आहे. कोरोना महामारेमुळे त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. मानसिक दडपणाखाली तो आपल्या देशाच्या क्रीडा पथकासमवेत ऑलिंपिक स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला होता. युगांडाच्या वेटलिफ्टर्ससाठी सराव शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातून तो अचानक गायब झाला होता. आपल्याला नोकरीची गरज असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी आपण जात असल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवली होती. जपान पोलिसांनी सर्वत्र शोध मोहिम उघडली आणि अखेर त्यांनी या वेटलिफ्टरचा शोध घेण्यात यश मिळविले.