मुख्यमंत्र्याच्या नावाने उघडले होते खाते
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून मुख्यमंत्र्याच्या नावाने पैशांची मागणी करणाऱया संशयिताला उत्तर प्रदेशातील मथुरा येथे अटक करण्यात आली आहे. संशयिताच्या गाडीची झडती घतली असता त्याच्याकडे 200 हुन अधिक सिम कार्ड मिळाली आहेत. गोवा पोलीस आणि मथुरा पोलीस यांच्या संयुक्तविद्यमाने ही कारवाई कण्यात आली आहे. सोपस्कर पूर्ण करून संशयिताला गोव्यात आणले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अटक केलेल्या संशयिताचे नाव मोहद शाखीर असे आहे. संशयित फेसबुकवर बनावट खाती उघडून त्यांच्या आधारे पैसे हडप करीत होता. गोव्याच्या सायबर पोलीस विभागाने ही कारवाई केली असून पुढल तपास करीत आहेत.