वार्ताहर / जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात सोमवारी एकाच दिवशी कोरोनाबाधित 33 रुग्ण आढळून आले असून एकूण बाधित संख्या 263 वर पोचली असल्याचे जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी सांगितले. जिल्हय़ातील इलकल येथे 12, कलादगी 7, बागलकोट 6, जमखंडी 4, बदामी 4 असे एकूण 33 जणांना कोविड बाधा झाल्याचे आढळून आले.
बदामी येथील रुग्ण क्रमांक 9153 च्या प्राथमिक संपर्काने 25 वर्षाची महिला, बागलकोट तालुक्मयातील मनहळ्ळी येथील 80 वर्षांचा वृद्ध, जमखंडी ज्वारी बाजार येथील रुग्ण क्रमांक 10643 च्या प्राथमिक संपर्काने 42 वर्षाचा पुरुष, 21 वर्षाचा युवक, 28 वर्षांचा युवक, 43 वर्षाचा पुरुष यांना बाधा झाली.
बळ्ळारीच्या रुग्ण क्रमांक 14674 च्या संपर्काने इलकल येथील 45 वर्षांचा पुरुष, 19 वर्षाचा युवक, 23 वर्षाची युवती, 19 वर्षाची युवती, 48 वर्षाची व 50 वर्षाची महिला, 18 वर्षाची युवती, 16 वर्षाचा मुलगा, 23 वर्षाचा युवक, 48, 55, 31 वर्षांचे पुरुष यांना बाधा झाली.
बागलकोट मॅगेरी येथील रुग्ण क्रमांक 10173 च्या संपर्काने 60 वर्षाची महिला, 42 वर्षाची महिला, 21 व 19 वर्षाचा युवक, 36 वर्षाची महिला यांना संसर्ग झाला.
कलादगी येथील रुग्ण क्रमांक 8300 च्या संपर्कामुळे 81 वर्षाची वृद्धा, 50 वर्षाची महिला, 65 वर्षाचा वृद्ध, 27 वर्षाचा युवक, 44 वर्षाचा पुरुष, 40 वर्षाचा पुरुष, 25 वर्षाची युवती यांना कोरोना बाधा झाली.
बदामी मंजुनाथनगर येथील रुग्ण क्रमांक 9153 च्या संपर्काने 26 वर्षाची युवती, रत्नागिरीहून परतलेला हुनगुंद येथील 31 वर्षाचा पुरुष, उडुपीहून परतलेला हुनगुंद येथील 36 वर्षांचा पुरुष बाधित आढळून आले.
आतापर्यंत जिल्हय़ात 14748 व्यक्तींचे नमुने पाठविण्यात आले असता 13,329 निगेटिव्ह, 263 पॉझिटिव्ह, 6 बळी, 137 बरे, 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.