प्रतिनिधी /फोंडा
बाजारमळ कुर्टी, फोंडा येथील एका बेकायदेशीरित्या कार्यरत असलेल्या भंगारअंडय़ावर काल मंगळवारी कुर्टी खांडेपार पंचायतीतर्फे कारवाई करण्यात आली. भंगारअडय़ाच्या बाजूला बेकायदेशीरित्या बांधकामद्वारे अतिक्रमण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पंचायतीतर्फे ही कारवाई करण्यात आली.
कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर भंगारअंडय़ाबाबत संदीप पारकर या ग्रामस्थाने तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पंचायतीतर्फे सदर भंगारअडय़ाची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार कारवाई करताना भंगारअड्डा चालक भसवराज अल्लयानावर याच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली. तसेच दहा दिवसाच्या मुदतीत सर्व कायदेशीर कागदपत्रे पंचायत कार्यालयात जमा करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र भंगाअड्डावाल्याने कागदपत्रे जमा न करू शकल्याने त्याच्याविरोधात पंचायत राज 1994 कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. अतिक्रमाण केलेले बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले.