प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून या बाधितांना सेवा पुरवण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. आशा, अंगणवाडी सेविका, व्हॉट्सअप ग्रुप, फोन, तसेच 1077 कॉलसेंटरच्या माध्यामातून बाधितांशी संपर्क साधला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयात बेडची संख्या कमी पडत आहे. ज्या बाधितांना जास्त उपचाराची गरज आहे. आशा बाधितांना रूग्णालयात दाखल केले जात आहे. याशिवाय मध्यम व सौम्य लक्षणे असणाऱयांना त्यांच्या परवानगीने होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे.
जे होम आयसोलेशनमध्ये आहेत तिथे आशा स्वयंमसेविका, अंगणवाडी सेविका दररोज भेट देतात. त्यांची तपासणी करून उपचाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांपर्यंत पोहचविली जाते. तसेच व्हॉट्सअप गुप तयार करण्यात आला आहे. या गुपमध्ये बाधित, डॉक्टर यांच्याशी दररोज चर्चा केली जाते. नियमित फोन करून माहिती घेतली जाते. त्याबरोबर 1077 या कॉलसेंटरवरून बधितांना फोन केला जातो. अशा प्रकारे जिह्यातील आरोग्य यंत्रणा बाधितांशी संपर्क साधत आहे. जिह्यातील आरोग्य यंत्रणा बाधितांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनी सांगितले.