वृत्तसंस्था/ नेपियर
पाकचा क्रेकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱयावर असून उभय संघात कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. 26 ते 30 डिसेंबर दरम्यान माऊंट माँगनुई येथे पहिल्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. पाकचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीचा फलंदाज इमाम उल हक दुखापतीमुळे या कसोटीत खेळू शकणार नाहीत, असे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले.
या पहिल्या कसोटीत पाकचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे सोपविण्यात आले आहे. पाकच्या कसोटी संघाचा रिझवान हा 33 वा कर्णधार आहे. न्यूझीलंडच्या दौऱयात पाक संघाला टी-20 मालिका गमवावी लागली आहे.
पाकचा कसोटी संघ- मोहम्मद रिझवान (कर्णधार), अबीद अली, अझहर अली, फईम अश्रफ, फवाद आलम, हॅरिस सोहेल, इम्रान बट्ट, मोहम्मद अब्बास, नसीम शहा, सर्फराज अहमद, शादाब खान, शान मसूद, शाहीन आफ्रिदी, सोहेल खान आणि यासीर शहा.