शुक्रवारी वकिलांच्या कुटुंबीयानांही दिली लस
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव बार असोसिएशनमधील वकिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना लस द्यावी, यासाठी बेळगाव बार असोसिएशन आणि कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य विनय मांगलेकर यांनी प्रयत्न केले होते. एकूण चार टप्प्यांमध्ये वकिलांसह त्यांच्या कुटुंबीयांना अशा एकूण 1 हजार जणांना लस देण्यात आली. शुक्रवारी 300 जणांनी लसीचा लाभ घेतला.
वकीलही कोरोना योद्धेच आहेत. त्यामुळे वकिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लस द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य विनय मांगलेकर आणि बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ यांच्यासह इतर सदस्यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे मागणी केली होती. त्यामुळे तातडीने लस उपलब्ध करून देण्यात आल्या. शुक्रवारी वकील व त्यांच्या कुटुंबीयांना 300 जणांना लस देण्यात आली. यावेळी विनय मांगलेकर, उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, सदस्य नितीन गंगाई, कलमेश मायण्णाचे, बसवराज सुलतानपुरी, विश्वनाथ सुलतानपुरी आदी उपस्थित होते. लस उपलब्ध केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आणि प्रादेशिक आयुक्तांचे आभार मानण्यात आले.