प्रतिनिधी /बेळगाव
ऑल इंडिया बीएसएनएल-डिओटी पेन्शनर्स असोसिएशन बेळगाव या संस्थेची बैठक नुकतीच गांधीभवन येथे पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पेन्शनर्सची थकबाकी सरकारकडे असून त्यांनी ती त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी बैठकीदरम्यान करण्यात आली. बैठकीला संघटनेचे राज्य अध्यक्ष आर. बी. तटपती, उपाध्यक्ष बी. बी. पत्तार, खजिनदार एन. एल. भोसले, जिल्हा सेपेटरी एस. एस. सारापुरे, संघटन प्रमुख एस. जी. गस्ती उपस्थित होते. पेन्शनधारकांचे मेडिकल बिल अद्याप देण्यात आलेले नाही. याचबरोबर अनेकांची निवृत्ती पेन्शनही सरकारकडे अडकली आहे. ती सरकारने त्वरित पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी ही मागणी सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला जिल्हाभरातून 900 हून अधिक सदस्य सहभागी झाले होते. निंबाळकर यांनी आभार मानले.