वेंगुर्ले /वार्ताहर-
बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासातून त्यांचे भविष्य घडविण्यासाठी बांधलेल्या खर्डेकर कॉलेजमुळे विद्यार्थी मोठ्या पदावर काम करत आहेत. माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थान दिलं त्या खर्डेकर कॉलेजचे मी आभार मानतो. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास चांगल्या प्रकारे व सोयी,सुविधांनी शिक्षण मिळावे. बँ. खर्डेकर साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी खारीच्या वाट्याप्रमाणे प्रयत्न करीत आहे. असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेचे कर निर्धारण अधिकारी गोविंद उर्फ विजू नरहरी गावडे यांनी बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांचा 58 स्मृती दिन कार्यक्रम खर्डेकर महाविद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे गोविंद उर्फ विजू गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खामकर प्रा. बी. बी. जाधव, वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांचा समावेश होता. यावेळी प्राचार्य विलास देऊलकर यांनी बँ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या निस्वार्थीपणे शिक्षण देण्यासाठी केलेल्या विविध कामांना व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.