वृत्तसंस्था / बेंगळूर :
येथे 10 फेब्रुवारीपासून खेळविल्या जाणाऱया बेंगळूर खुल्या एटीपी चँलेजर टेनिस स्पर्धेत भारताचा ज्येष्ठ टेनिसपटू लियांडर पेस सहभागी होणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
162,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेची ही स्पर्धा येथील कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेच्या स्टेडियममध्ये होणार आहे. लियांडर पेसने अलिकडेच आपल्या निवृत्तीचे संकेत दिले असून त्याचा मायदेशातील हा शेवटचा टेनिस हंगाम राहील. 46 वर्षीय लियांडर पेसने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत एटीपी टूरवरील दुहेरीतील 54 अजिंक्यपदे मिळविली असून त्याशिवाय 8 ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीचे तर मिश्र दुहेरीत 10 ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील अजिंक्यपदे मिळविली आहेत. पेसने 1996 च्या ऍटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कास्यपदक मिळविले होते. त्याने आतापर्यंत 97 ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील सामन्यात सहभाग दर्शविला आहे.