बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये कोरोनाची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात नवीन कोविड -१९ प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून, बीबीएमपीने मंगळवारी आणखी तीन कंटेनमेंट झोन जाहीर केले.
दशरहळ्ळी, आरआर नगर आणि येळहांका विभागातील प्रत्येकी एक आहेत, जेथे प्रत्येकी अनुक्रमे ९,१५ आणि ६ प्रकरणांची नोंद झाली आहे.
यासह, शहरातील एकूण सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ३१ झाली. दशरहळ्ळी आणि येळहांका झोनमध्ये सर्वात जास्त सक्रिय कंटेनमेंट झोन (९) आहेत. त्यानंतर बीबीएमपी ईस्ट (८), आणि बीबीएमपी वेस्ट आणि बीबीएमपी दक्षिण अशा प्रत्येकी दोन कंटेनमेंट झोन आहेत