1 लाख 90 हजारांचे साहित्य जप्त, कृषी विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
किटक नाशक औषधे, खत आणि बी-बियाणे विक्रीसाठी कृषी खात्याकडे परवान्यासाठी अर्ज केला. अर्ज करुन दुकानही सुरू केले. मात्र त्या मालकाला रितसर परवानगी देण्यात आली नव्हती. तरी देखील विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱयांना मिळाली. त्यानंतर तातडीने त्या यरगट्टी विभागातील अक्कीसागर येथील विनापरवाना सुरू केलेल्या अंजनेय ऍग्रोवर धाड टाकून 1 लाख 90 हजार रुपयांची किटकनाशक औषधे व खते जप्त केली आहेत.
सौंदत्ती तालुक्मयातील अक्कीसागर येथे चिदानंद एस. कत्ती यांनी अंजनेय ऍग्रो या नावाने कृषी दुकान सुरू केले. त्यांनी कृषी खात्याकडे परवानगीसाठी अर्ज केला. मात्र अर्ज मंजूर करण्यापूर्वीच हे दुकान सुरू केल्यामुळे कृषी अधिकारी झिलाणी मोकाशी, आर. बी. पाटील आणि सुप्रिता अंगडी यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे झिलाणी मुकाशी, आर. बी. पाटील यांनी या दुकानातील सर्व साहित्य जप्त करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. अशा प्रकारे कोणीही बेकायदेशीर कृषी दुकाने सुरू केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.